Ad will apear here
Next
‘सात-बारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे’
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

पुणे : ‘पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे,’ अशा सूचना महसूलमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पाच जुलैला झाली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्वेता सिंघल, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. अभिजित चौधरी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, गोपीचंद कदम, साहेबराव गायकवाड, रामचंद्र शिंदे, तसेच महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण, अजित पवार, जयंत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.    

पाटील म्हणाले, ‘गौण खनिज वसुलीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे. यात आवश्यक बदल सुचविण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अन्य राज्यांच्या गौण खनिज वसुली पद्धतीचा अभ्यास करून अहवाल राज्य शासनाला सादर करावा. सातबारा संगणकीकरणाचे कोल्हापूर जिल्ह्याचे काम ८४ टक्के झाले असून, नागरिकांच्या सोयीसाठी अन्य जिल्ह्यांनीही यास प्राधान्य देऊन हे काम तात्काळ पूर्ण करावे.’


या वेळी पाटील यांनी सात-बारा संगणकीकरणांतर्गत डिजिटल सिग्नेचर पोर्टल (डीएसपी) या आज्ञावलीत कामाची सद्यस्थिती, ई-फेरफार, ऑनलाइन डाटा कम्फर्मेशन, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण याबरोबरच जमीन महसूल व गौण खनिज वसुली याबाबतचा आढावा घेतला.

या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सादरीकरण करून पुणे विभागातील कामांच्या सद्यस्थितीची तसेच कोल्हापूर क्रीडा संकुल, पंढरपूर व आळंदी विकासकामांबाबत माहिती दिली. विभागातील सर्व जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्याची माहिती सादर केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZVNCC
Similar Posts
‘टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात’ पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
‘‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन’ पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार आहे,’ अशी
‘मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून मतदान प्रक्रिया पार पाडा’ पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्‍या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language